गरीबीचे दुःख पचवून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहत तरुण वयात डॉ. साहेबांनी सर्वसामान्य सेवा करीत नाव लौकिक मिळवला. वैदकीय सेवेतून त्यांना शैक्षणिक कार्याची आवड निर्माण झाली. त्या पाठीमागे कै. डॉ. प्रभा जे. मगदूम यांच्याच फक्त प्रेरणेतून जयप्रभा इंग्लिश स्कूलची स्थापना करून शैक्षणिक कार्यास प्रारंभ केला. ग्रामीण भागातील विशेषता शिरोळ तालुक्यातील व आजूबाजूच्या खेड्यातील व विध्यार्थी ची शिक्षणाच्या बाबतीत गोर-गरिबांच्या होत असलेली अडचण व कुंचबाना पाहून त्यांना गरज म्हनून पोलिटेक्निक कॉलेजला मान्यता मिळवून पश्चिम महाराष्ट्रात डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टची स्थापना करून शैक्षणिक क्रांतीची मशाल पेटविली. कै. डॉ. प्रभा मगदूम यांच्या कल्पनेतूनच आज जे. जे. मगदूम ट्रस्टचे नाव शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. सध्या ट्रस्टच्या माध्यमातून पोलिटेक्निक,होमेओपथिक मेडिकल, इंजिनिअरिंग, डि फार्मसी, आयुर्वेदिक व नर्सिंग कॉलेज यादी संस्था बरोबर यशवंतराव चव्हान मुक्त विद्ध्यापीठ, मोदी हॉस्पिटल यादी संस्था समर्थपणे उभा करून कै. जो. ते. पी. जी. ही संकल्पना राबविली. ट्रस्टच्या माध्यमातून सध्या १७ शैक्षणिक संथ कार्यरत आहेत. त्यातील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविध्यालायास एन. बी. ए. नवी दिल्ली मानांकन प्राप्त झाले आहे.Read More....