गरीबीचे दुःख पचवून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहत तरुण वयात डॉ. साहेबांनी सर्वसामान्य सेवा करीत नाव लौकिक मिळवला. वैदकीय सेवेतून त्यांना शैक्षणिक कार्याची आवड निर्माण झाली. त्या पाठीमागे कै. डॉ. प्रभा जे. मगदूम यांच्याच फक्त प्रेरणेतून जयप्रभा इंग्लिश स्कूलची स्थापना करून शैक्षणिक कार्यास प्रारंभ केला. ग्रामीण भागातील विशेषता शिरोळ तालुक्यातील व आजूबाजूच्या खेड्यातील व विध्यार्थी ची शिक्षणाच्या बाबतीत गोर-गरिबांच्या होत असलेली अडचण व कुंचबाना पाहून त्यांना गरज म्हनून पोलिटेक्निक कॉलेजला मान्यता मिळवून पश्चिम महाराष्ट्रात डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टची स्थापना करून शैक्षणिक क्रांतीची मशाल पेटविली. कै. डॉ. प्रभा मगदूम यांच्या कल्पनेतूनच आज जे. जे. मगदूम ट्रस्टचे नाव शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. सध्या ट्रस्टच्या माध्यमातून पोलिटेक्निक,होमेओपथिक मेडिकल, इंजिनिअरिंग, डि फार्मसी, आयुर्वेदिक व नर्सिंग कॉलेज यादी संस्था बरोबर यशवंतराव चव्हान मुक्त विद्ध्यापीठ, मोदी हॉस्पिटल यादी संस्था समर्थपणे उभा करून कै. जो. ते. पी. जी. ही संकल्पना राबविली. ट्रस्टच्या माध्यमातून सध्या १७ शैक्षणिक संथ कार्यरत आहेत. त्यातील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविध्यालायास एन. बी. ए. नवी दिल्ली मानांकन प्राप्त झाले आहे.
त्यांच्या शैक्षणिक संस्थेतून बाहेर पडलेले हजारो विध्यार्थी विविध देशात प्रांतात उच्च पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अतुलनीय कार्यातूनच त्यांना विविध पुरस्काराने गोरविण्यात आले. त्यामध्ये 'प्रियदर्शनी इंदिरा गांधी अवार्ड सन २००१', 'जयसिंगपूर भूषण २००४', 'जीवन गौरव व कृतज्ञता पुरस्कार २००४', 'समाज भूषण २००५ ', 'डॉक. कर्मवीर भाऊराव पाटील समाजसेवा पुरस्कार २००१', फाय फौउडेशन, आदि पुरस्कारातून त्यांना पुरस्कृत करण्यात आले. तसेच, त्यांनी जयसिंगपूर नगरपालिकेत नागराध्क्ष पदावरती असताना ,लक्ष्मिरोड बांधकाम ,समाज मंदिर .शाळा नं .,गटार बांधणी ,अशी विविध कार्यातून जयसिंगपूर शहराची प्रगती साधण्याचा कातोकात प्रयत्न केल.
डॉ. मगदूम यांनी भारत अर्बन बँक , जयसिंगपूरचे चेअरमन पद सलग तीन वेळेला भूशिवले . त्याबरोबर मेडिकल ट्रस्ट जेष्ठ नागरिक संघटना ,रोटरी कल्ब आदि संस्थामध्ये अध्क्षशपदाची दूर सांभाळलेली डॉ . जे . जे. मगदूम नगरपालिकेच्या राजकारणात सतत चाळीस वर्षे कार्यरत राहिले त्यामध्ये त्यांनी तीनवेळा नागराध्क्षपद भूषिविले . त्या काळात ते जयसिंगपूर वासियांना अनेक सोयी - सुविधा उपलब्ध करून देण्यात यशस्वी ठरले. यामुळेच खरोखरच ते जयसिंगपूरचे भूषण ठरले.
सेवाभावी वृत्तीमुळे ते कधीही स्वतः साठी जगले नहित. रोज नव्या समस्या अडचणीवर मत करून आणखीन काही चांगले येते का याचा सतत ध्यास घेतल्याने ते नेहेमी कार्यरत असत . अनेक समस्या सोडवत दु:खा वर मात करत कै.डॉ . प्रभा मगदूम यांच्या सहकार्यामुळे व मोठ्या धीराने व हिरहिरीने आपले जीवन सुसह्य केले. विनोदी स्वभाव व मन मिळाऊ वृत्तीमुळे ते सर्वाना हवेहवेसे वतयेचे. काम चुकारपणा करणाऱ्यांचा त्यांना तिरस्कार वाटायचा. आपला वाढदिवस ते नेहमी रुग्णांना मोफत आरोग्याचे शिबीर आयोजन करून साजरा करीत असत.
साधी राहणी व उच्च विचारसरणी यामुळे डॉक्टर साहेबांचे आशीर्वाद व मार्गदर्शन मिळावे यांसाठी प्रत्येकजण आसुसलेला असायेचा.त्यांचा सानिध्यात राहिल्यानंतर अडचणीवर मत कशी करावी ,आनंद जीवन कसे जगावे याचा अनुभव यायचा असे हे गौरव संपन्न व्यक्तिमत्व १४ ऑगस्त ,२०१२ रोजी हरपले .त्यांनी व डॉ . प्रभा मगदूम यांनी स्थापन केलेल्या डॉज़े. जे. मगदूम ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थाचा विस्तार मोठा आहे. वटवृक्षात रुपांतर झालेल्या या ट्रस्टचे कार्य त्याच जिदीने व कौशल्याने विध्यमान चेअरमन श्री. विजयराज मगदूम व अंड सौ. सोनाली मगदूम यांनी समर्थपणे सांभाळले आहे. वर्षभरात या ट्र स्ट चे कार्य आणखीन बहरलेले असून ट्र स्ट च्या कार्यात सुसूत्रता आणत त्यांनी शिस्तीचे मोठे धडे देत शैक्षणिक सुविधेमध्ये आणखीन भर घातली आहे. यामध्ये सेकन्ड शिफ्ट डिप्लोमा , सायन्स अण्ड कामर्स जुनिअर कॉलेज , व आय . टी . आय .कॉलेज सुरु केले आहेत. तसेच आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये पी. जी. सेंटर सुरु करण्याचा मानस आहे. त्याच बरोबर डॉ. मगदूम मधील विध्यार्थी सर्व क्षेत्रात गुण संपन्न व कार्यक्षम असला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच डॉ. मगदूम ट्रस्ट हे पश्चिम महाराष्ट्रात संशोधन बनिवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
हे शैक्षणिक कार्याचे शिव धनुष्य श्री. विजयराज मगदूम व सौ. सोनाली मगदूम यांनी समर्थपणे पेलले आहे. व पुढेही अतिशय कार्य कुशलतेने वाटचाल करण्याचा निर्धार आहे. डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट मध्ये जवळपास ५००० विध्यार्थी व १००० शिक्षक कार्यरत आहेत.
कोणताही वरदहस्त नसताना, शून्यातून त्यांना लीलया विश्व निर्माण केले. या महापुरुष्याचा विविध अवतारांनी अख्यायीका एक पितामह, एक डॉक्टर, नागराध्क्ष, बँकेचे चेअरमन, समाजसुधारक, दूरदर्शी वक्तीमत्व डॉ . जे. जे. मगदूम ट्रस्ट चे चेअरमन अशी सुरु होऊन संपयेचे नावच घेत नव्हते त्यांनी स्थापन केलेल्या सर्व संस्था आजही वट वृक्षाप्रमाणे पसरलेल्या आहेत आणि असंख्य उपभोक्ते ह्या संस्थेच्या शीतल छायेत विसावा घेत आहेत ह्या सर्व संस्थेत जीवापाड काम करायेची सवय अगदी शेवटपर्यंत होती . कोणतेही कार्य हाती घेतले तर ते तडीस नेणे हा त्यांचा ध्यास होता . लाखो करोडो रुपये असणाऱ्या धनिकांना जे जमले नाही त्यांनी स्वकष्टाने आणि स्वक्तृत्वाने करून दाखीवले . हे सर्व करीत असताना त्यांना कै. डॉ . प्रभा मगदूम यांची मोलाची साथ मिळाली . सर्व लोकांना आश्चर्य वाटते कि एवढी सगळी कार्ये त्यांना पटापट कशी जमतात . यापेक्षा ती सगळीच कार्य नावारूपाला कशी येतात हे एक गृढच म्हणावे लागेल . अम्हता तर वाटते या जयसिंगपूर नागरीसाठीच नव्हे तर आख्या महाराष्ट्रासाठीच एक डॉक्टर , शिक्षण महर्षी ,समाजसेवक ,ईश्वराने पाठविला असावा . त्यांना जयसिंगपूर नगरीचे नाव भारताच्या त्यांच्या कर्तुत्वाने उमटविले आहे . त्यासाठी कै . डॉ . प्रभा मगदूम यांच्या प्रेरणेने त्यांच्या कार्य कर्तुत्वाने व अर्धांगिनीच्या वात्यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे . या दोघांमुळेच अगणित कुटुंबाचे चरितार्थ चांगल्या प्रकारे चालते आहेत . त्यांच्यामुळेच , जयसिंगपूर नगरीस एक वेगळेच वैभव प्राप्त झाले आहे . या दोघांवारती जयसिंगपूर नागरीनेही जीवापाड प्रेम केले . जयसिंगपूर भूषण हा पुरस्कार देऊन गौरविले होते . डॉ मगदूम यांच्या महत्व कर्मांची दाखल घेऊन त्यांना नानविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते . एक साधू होऊन ताप करण्यापेक्षा , एक राजकारणी होऊन राजकारण करण्यापेक्षा , एक मनुष्य होऊन हजारो कुटुंबाना निस्वार्थीपणाने जगविले आणि ज्ञानदानासारखे व ओषधदानासारखे महान कार्य करणे कितीतरी पटीने श्रेष्ठच म्हणावे लागेल . याच पाऊला वरती पाऊल ठेऊन श्री . विजय मगदूम व सौ सोनाली मगदूम यांनी त्यांच्या कार्याचा ठसा मोठ्या आवडीने पेलला आहे. तसेच वर्षभरात नवीन अभ्यासक्रम सुरु करून आपल्या कार्य कुशलतेची जणू झळकच दाखविले आहे.
|